भारतीयांना आकर्षित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाहिरातींवर खर्च करणार 23 करोड रूपये


आगामी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धो ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये आधी महिला टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये पुरूषांची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या आधी भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाहिरातींवर तब्बल 23.4 करोड रूपये खर्च करणार आहे. या जाहिराती पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पर्यटन मंत्री सायमन बर्मिंघम यांनी सांगितले की, या जाहिरांतीद्वारे भारतीय पर्यटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बर्मिंघम म्हणाले की, ऑस्ट्रेलिया भारतीयांसाठी आधीपासूनच सर्वात मोठे पर्यटन बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ 8071 करोड रूपयांची आहे. जाहिराती महिला आणि पुरूष दोघांच्या स्पर्धेसाठी असणार आहेत. याद्वारे भारतात ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील.

भारतीय संघाने एकदाच टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. भारताने 2007 च्या स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर 2014 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. मात्र श्रीलंकेकडून पराभव स्विकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने एकदाही टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही. वेस्ट इंडिजने दोनदा, तर पाकिस्तान, इंग्लंडने एक-एकवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

बर्मिंघम म्हणाले की, विश्वचषकात भारतीय चाहत्यांना ऑस्ट्रेलियामध्ये येऊन आपल्या संघाला प्रोत्हासन देण्याची संधी मिळेल. ते वेगवेगळी शहर आणि स्टेडिअम पाहू शकतील.

ऑस्ट्रेलियाचे क्रिडा मंत्री रिचर्ड कोलबेक म्हणाले की, विश्वचषकामुळे ऑस्ट्रेलिया स्वतःला वैश्विक स्तरावर सिध्द करेल. ऑस्ट्रेलियामध्ये  महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन हे ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा संस्कृतिच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे आणि आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा देखील अशीच एक स्पर्धा आहे. यादरम्यान 10 लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे.

2035 पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या 12 लाखांपर्यंत पोहचू शकते.

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सामने –

तारीखसंघस्थळ        वेळ
21 फेब्रुवारीऑस्ट्रेलियासिडनीदुपारी 1:30

 

24 फेब्रुवारीनिश्चित नाहीपर्थसायंकाळी 4:30
27 फेब्रुवारीन्यूझीलंडमेलबर्नसकाळी 8:30
29 फेब्रुवारीश्रीलंकामेलबर्नदुपारी 1:30

 

Leave a Comment