अ‍ॅमेझॉन प्राईम ते पिझ्झा हट सर्वांवर चढली ‘2 केळ्यां’ची जादू


काही दिवसांपुर्वी अभिनेता राहुल बोसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले की, दोन केळ्यांसाठी चंदीगडच्या फाईव स्टार हॉटेल जेडब्ल्यु मेरिएटने त्याला442.50 रूपये आकारले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले. सोशल मीडियावर देखील लोकांनी राहूल बोस मुव्हमेंट म्हणत स्वतःचे अनुभव शेअर केले.


या प्रकरणानंतर हॉटेलला 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता. आता या प्रकरणाचा वापर मोठमोठ्या कंपन्या स्वतःच्या प्रमोशनसाठी करत आहेत. अनेक कंपन्यांनी ट्विटरवर पोस्ट करत हॉटेलला ट्रोल केले आहे.

 
पिझ्झा हट पासून ते रिलायन्स स्मार्ट सर्वच कंपन्यां 442.50 रूपयांच्या केळांवर मिम्स शेअर करत स्वतःचे प्रमोशन करत आहेत.

Leave a Comment