गांजा खरेदी करण्यासाठी तो बनला थॉर, बनवले खोटे ओळखपत्र


जगामध्ये अनेक विचित्र प्रकारची लोक आहेत आणि ही लोक अशाच काही विचित्र गोष्टी करतात की, त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचाच बोलबाला असतो. असेच एक विचित्र प्रकरण कॅनेडामध्ये घडले आहे. कॅनेडामध्ये एक मुलगा खोटे ओळखपत्र बनवत, गांजा खरेदी करण्यासाठी गेला. विशेष म्हणजे या खोट्या ओखळपत्रावर त्याने थोर ओडिसन हे नाव लिहिले होते व त्यावर फोटो देखील थॉर म्हणजेच थॉरची भूमिका साकारणार अभिनेता क्रिस हेम्सवर्थ याचा लावला होता.

तुम्हाला मार्वल स्टुडिओ आणि सुपरहिरोंच्या चित्रपटांची आवड असेल तर थॉर नक्कीच माहित असेल. थॉर हे एक चित्रपटातील पात्र आहे. थॉर दुसऱ्या ग्रहावरील एक निवासी असून, त्याच्या वडिलांचे नाव ऑडिन आहे. कॅनेडामध्ये अनेक भागात गांजा मिळतो. मात्र गांजा विकत घेण्यासाठी आधी आयडी दाखवावा लागतो. गांजा खरेदी करण्यासाठी गेलेल्या त्या मुलाने चक्क खोट्या ओखळपत्रावर क्रिम हेम्सवर्थचा फोटो लावला होता आणि त्यावर थॉर ऑडिनसन असे नाव लिहिले होते.

थॉरचा फोटो बघून गांजा विक्रेत्याने देखील डोक्याला हात लावला असेल. ट्विटर एकाने या आयडीचा फोटो शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या आयडीवर अनेकांनी मजेशीर कमेंट देखील केल्या.

Leave a Comment