कोण आहेत पहिल्या महिला आमदार मुथुलक्ष्मी रेड्डी ?


गुगलने आज भारताच्या पहिल्या महिला आमदार मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त डूडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुथुलक्ष्मी या भारताच्या पहिल्या महिला आमदाराबरोबरच शिक्षक, सर्जन आणि समाजसुधारक देखील होत्या. मुथुलक्ष्मी या पहिल्या अशा विद्यार्थींनी होत्या ज्यांनी महाराजा कॉलेज आणि मद्रास कॉलेज येथे अॅडमिशन घेतले होते. त्यांना सामाजिक असमानता, लिंगभेदभाव आणि सामान्या नागरिकांसाठी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी देखील ओळखले जाते.

मुथुलक्ष्मी या पहिल्या महिला होत्या ज्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केले होते. त्यांच्या आधी कोणत्याही महिलेने असे केले नव्हते. जेव्हा त्यांचे लग्न करण्याची वेळ आली, त्यावेळी लग्न नाकारून त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री एनी बेसेंट आणि सरोजिनी नायडू यांच्याबरोबर झाली.

तामिळनाडूमध्ये प्रत्येकवर्षी त्यांच्या जन्मदिनी 30 जुलैला हॉस्पिटल दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म 30 जुलै 1883 ला तामिळनाडू येथे झाला होता. तसेच, कमी वयात होणाऱ्या मुलींच्या लग्नाला त्यांनी विरोध केला. त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 22 जुलै 1968 ला चेन्नई येथे मुथुलक्ष्मी यांचे निधन झाले. मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी आपल्या कार्याद्वारे अनेक मुलींचे जीवन बदलले.

Leave a Comment