सर्वेक्षण : ऑर्डर पोहचवण्याआधी डिलीवरी बॉय स्वतः चाखतात जेवण


ऑनलाईन फुड डिलीवरी कंपन्यांमधील चार पैकी एक डिलीवरी बॉय जेवण पोहचवण्याआधी स्वतः चाखतो अथवा खातो. अमेरिकेतील चार कंपन्यांच्या 500 डिलीवरी बॉयवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.

हे सर्वेक्षण अमेरिकेच्या खाद्य विभागाने केले आहे. विभागातर्फे सांगण्यात आले की, मागील अनेक दिवसांपासून डिलीवरी बॉयच्या विरोधात तक्रारी येत होत्या. अनेक ग्राहकांनी तक्रार केली होती की, त्यांना अन्न हे थंड आणि कमी मिळते.

तक्रारीनंतर विभागाने उबर ईटस, ग्रबहब, डोरडॅश आणि पोस्ट मॅट्स या अपच्या डिलीवरी बॉयवर सर्वेक्षण केले. यामध्ये समोर आले की, केवळ 20 मिनिटांवरील ऑर्डर पोहचवण्यासाठी डिलीवरी बॉय सरासरी 40 मिनिटे लावतात. तर काहीजण जेवण पोहचवण्यासाठी 70 मिनिटे देखील लावतात.त्यामुळे ग्राहकांना थंड अन्न मिळते. काही ग्राहकांना अन्नावरील पॅकिंग निघालेली दिसते तर काहींना अन्नच कमी मिळते.

या सर्वेक्षणामध्ये अमेरिकाच्या खाद्य विभागाने1518 लोकांचे सर्वेक्षण केले. तसेच ज्यांनी फूड डिलीवरी अॅपसाठी एकदा तरी काम केले आहे अशा 500 लोकांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणामध्ये दिसून आले की, अमेरिकन माणसाच्या फोनमध्ये दोन फूड डिलीवरी अॅप असतात. ज्याद्वारे ते महिन्यातून तीन वेळा ऑर्डर करत असतात. सर्वात लोकप्रिय अपमध्ये उबर इटस, ग्रबहब, डोरडॅश आणि पोस्ट मॅट्स यांचा समावेश आहे.  या अॅप्सनी लोकांच्या घराच्या आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानदारांशी भागीदारी केली आहे.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 25 टक्के डिलीवरी बॉयने स्विकार केले की, अन्न चाखून बघितलेले आहे. तर सर्वेक्षणामध्ये दिसून आले की, 46 टक्के लोक ऑफर बघून ऑर्डर करतात. 54 टक्के लोक आपल्या आवडीच्याच हॉटेलमधून अन्न मागवतात. तर 46 टक्के  लोक जेवणाचे फोटो बघून ऑर्डर करतात.

Leave a Comment