अ‍ॅमेझॉन भारतात लवकरच सुरू करणार ऑनलाईन फुड डिलीवरी सर्व्हिस


अ‍ॅमेझॉन भारतात लवकरच ऑनलाईन फुड डिलीवरी सर्व्हिस सुरू करणार आहे. सध्या भारतात फुड डिलीवरी क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने हा निर्णय घेतला आहे.

अ‍ॅमेझॉन यासाठी स्थानिक भागीदाराच्या शोधातून असून, स्थानिक कंपनी कॅटारमरन यांच्याशी चर्चा सुरू आहे. कॅटारमरनची स्थापना नारायण मुर्ती यांनी केलेली आहे.तसेच, अ‍ॅमेझॉन ही सर्व्हिस सणांच्या काळात सुरू करणार आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन ही सर्व्हिस सुरू करण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षण करणाऱ्या रेडसीर कंन्सल्टिंगनुसार, 2018 मध्ये भारतात ऑनलाईन फुड ऑर्डर करणाऱ्यांची संख्या 176 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या भारतात या क्षेत्रात स्विगी आणि झोमॅटो यांचे वर्चस्व आहे. उबेर टेक्नोलॉजीने 2017 मध्ये फुड डिलीवरी सर्व्हिस सुरू केली. मात्र स्थानिक ग्राहकांना आकर्षित करण्यास उबेर अपयशी ठरली आहे.

याशिवाय अ‍ॅमेझॉन उबेर ईटस खरेदी करणार असल्याचे म्हटले जात आहे.  मात्र दोन्ही कंपन्यांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. ओलाने देखील 2017 मध्ये फुडपांडा नावाने फुड डिलीवरी सर्व्हिस सुरू केली होती. मात्र आता कंपनी स्वतःच्या किचन ब्रँडवर लक्ष केंद्रित करणार आहे.

मागील महिन्यातच अ‍ॅमेझॉनने स्पर्धेमुळे अमेरिकेतील त्यांची फुड डिलीवरी सर्व्हिस बंद केली आहे. अ‍ॅमेझॉनने 2016 मध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राईम ही व्हिडीओ आणि म्युजिक सर्व्हिस देखील सुरू केली होती. तसेच वस्तू डिलीवरी करण्याची त्यांची सर्व्हिस देखील भारतातील अनेक शहरांमध्ये सुरू आहे.

Leave a Comment