हिमा दासवरून वाघाच्या बछड्याचे नामकरण


२९ जुलै रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक व्याघ्र दिनाचे निमित्त साधून बंगलोरच्या बानेरघट्टा बायोलोजिकल पार्क मधील एका वाघाच्या बछड्याला भारताची धावपटू हिमा दास हिचे नाव दिले गेले आहे. हिमा दास या आसाम मधील शेतकरी कन्येने १९ दिवसात विविध धाव स्पर्धात ५ सुवर्णपदके कमावून भारताचे नाव उज्ज्वल केले असून तिच्या सन्मानार्थ या बछड्याला तिचे नाव दिले गेल्याचे सांगितले जात आहे.

भारतात पुन्हा एकदा वाघाच्या संख्येत चांगली वाढ होत आहे ही प्राणीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. बंगलोर मधील हा बछडा सहा महिन्यांचा आहे. रविवारी अन्य तीन पिलांसह त्याला या पार्क मध्ये सोडले गेले. हिमा उत्तम अॅथलिट आहेच पण त्याचबरोबर चांगली माणूस आहे. तिने तिच्या पगारातील निम्मी रक्कम आसाम पूरग्रस्त कामासाठी दिली आहे.

यापूर्वी क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांची नावेही वाघांना दिली गेली आहेत. हा व्याघ्र बचाव मोहिमेचा एक भाग असल्याचे समजते.

Leave a Comment