मधुमेहींसाठी उपयुक्त पामर किंवा जांभूळ आंबा


उन्हाळ्याचे दिवस हे रसदार, रसाळ आंब्याचे दिवस तर पावसाळ्यात जांभळे खाण्याची मजा काही औरच. ही दोन्ही फळे ज्यांना मनापासून आवडतात त्यांना या दोन्ही फळांची चव एकाच फळात मिळाली तर? होय या दोन्ही फळांची चव एकत्र चाखण्याची संधी आता भारतीयांना साधता येणार आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात विकसित झालेला जांभूळ आंबा, मूळ नाव पामर मँगो, आता उत्तर प्रदेशात काही ठिकाणी लावला गेला आहे. हा आंबा मधुमेहींसाठी खूपच उपयुक्त असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत.


या जातीचे सगळ्यात पहिले रोप १९२५ साली मियामी येथे लावले गेले होते. २००१ पासून या इंटरनेटवर या विशेष आंब्याची चर्चा होते आहे. ब्राझील मध्ये या जातीच्या आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. आता भारतात या जातीच्या आंब्याची लागवड केली जात असल्याचे समजते. सोशल मिडीयावर त्यासंदर्भात बातम्या येत आहेत. या आंब्याचा रंग फिकट जांभळा असून जांभूळ आणि आंबा या दोन झाडांच्या संयोगातून हि जात विकसित गेली आहे असे सांगितले जात आहे. या आंब्याची चव आंबा आणि जांभूळ यांचे मिश्रण आहे.

या आंब्यात अँटीऑक्सिडंट आहेत. याच्या सेवनाने पचन सुधारते, रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचा रोग दूर होतात, रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते, वजन नियंत्रणात येते असे सांगितले जाते. या आंब्याच्या जातीचे एक नाव टोमी एटकिन असे असून यातही दोन वेगळ्या जाती आहेत. अर्थात या आंब्याच्या सेवनाचे जे फायदे सांगितले जात आहेत त्याची पुष्टी केली गेलेली नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment