अशी आहे लिपस्टिकची कुळकथा


फॅशन, ग्लॅमर आणि फिल्मी जगतापासून ते घराघरातून महिला मुली लिपस्टिकचा वापर आजकाल सर्रास करतात. २९ जुलै हा जागतिक लिपस्टिक डे म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने लालभडक लिपस्टिक लावलेल्या अनेकजणी त्यांचे फोटो शेअर करत आहेत. अनेक रंगात, अनेक किमतीत आणि अनेक प्रकारात मिळणारे हे सौदर्यप्रसाधन महिलांसाठी रोजच्या गरजेचा एक भाग बनले आहे. मात्र तिचे कुळ नक्की कुठले आणि तिचा वापर कधीपासून सुरु झाला याची खात्रीलायक माहिती मिळत नाही.

इंटरनेटवरून मिळालेली माहिती खरी असेल तर असे म्हणावे लागेल कि ५ हजार वर्षापूर्वीच्या सुमेरियन संस्कृतीत मौल्यवान रत्नांची बारीक पूड करून ओठ सजविण्यासाठी तिचा वापर केला जात होता. इजिप्तची सौंदर्यसम्राज्ञी राणी क्लिओपात्रा किडे मारून त्या रंगातून ओठ लाल करत असे. सिंधू संस्कुती मध्ये महिला ओठ लाल दिसावे म्हणून गेरूचा वापर करत असत. इजिप्त मध्ये त्या काळी फक्त शक्तिशाली आणि श्रीमंत स्त्रिया रोज लिपस्टिक वापरत असे इतिहास सांगतो.


इजिप्त मध्ये त्याकाळी लिपस्टिक लावणे हा ओरल सेक्सचा संकेत मानला जात असे असेही सांगितले जाते. वेश्या त्यांच्या सेक्स पार्टनरला खुश करण्यासाठी लिपस्टिक वापरत असत. १९ व्या शतकाच्या अखेरी फ्रांसची कॉस्मेटिक कंपनी गुएरलेनने प्रथम लिपस्टिक निर्मिती केली. १८८४ मध्ये पहिली व्यावसायिक लिपस्टिक बनविली ती पॅरीसच्या अत्तर निर्मिती करणाऱ्यांनी. अरबी संशोधक अबुलकोसिस याने ९ व्या शतकात घट्ट म्हणजे भरीव लिपस्टिकचा शोध लावला असाही एक प्रवाद आहे. सर्वाधिक काळ ओठावर टिकून राहणारी लिपस्टिक मात्र १९५० मध्ये तयार झाली असे सांगितले जाते.

Leave a Comment