या व्यक्तीने केला 24 तासात तब्बल 7 देश फिरण्याचा विक्रम


जगामध्ये तुम्हाला असे अनेक विचित्र लोक पाहायला मिळतील, ज्यांच्या कारनाम्यांमुळे आपण आश्चर्यचकित होतो. अशाच एक जिद्दी व्यक्तीचे नाव डेविड कोवारी आहे. डेविडने 24 तासात 7 देशांचा प्रवास करण्याचा विक्रम केला आहे. या प्रवासावर निघण्याआधी डेविडने याआधीच्या विक्रमांची माहिती घेतली व त्यानंतर स्वतः एक नवीन विक्रम तयार केला आहे.

याआधी 2013 मध्ये ग्लेन बर्मिस्टर या व्यक्तीने 24 तासात युरोपमधील 4 देशांचा प्रवास केला होता. त्याने चेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया आणि हंगरी या देशांचा प्रवास केला होता. ग्लेननंतर कार्स्टेन कोहलरने पाच देशांचा प्रवास करत विक्रम केला होता. त्याने  बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, लग्जरबर्ग आणि फ्रांस देशांचा प्रवास केला होता. कार्स्टननंतर 2016 मध्ये जर्मनीच्या मायकल मॉलने 24 तासात इटली, स्वीझर्लँड, लिचेस्टेनस्टीन, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि फ्रांस या 6 देशांचा प्रवास केला होता.

डेविडने आपल्या प्रवासाची सुरूवात पोलंडपासून केली. पोलंडपासून सुरूवात करत त्याने चेक रिपब्लिक, स्लोवाकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लोवेनिया आणि क्रोएशिया पोहचत नवीन विक्रम केला. या सात देशांचा जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करत त्याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरले.डेविडला शिक्षण पुर्ण करत असतानाच वाटत होते की, आपण असे काही केले पाहिजे की ज्यामुळे आपल्या आनंद होईल. त्याचबरोबर लोकांमध्ये प्रसिध्द होऊ व त्यांच्या कामी देखील येऊ असे काहीतरी करावे, असे त्याला वाटत होते.

त्यामुळे त्यांने एडव्हेंचरची निवड करत कमी वेळात जास्त देश फिरण्याचा विक्रम बनवण्याचा निश्चय केला. डेविडने आपले मास्टर्सचे शिक्षण बुडापेस्ट येथून पुर्ण केले आहे. हा विक्रम करण्याआधी त्याने मोठ्याप्रमाणात तयारी केली होती.

Leave a Comment