15 वर्षीय मुलाने रोज 8 तास गेम खेळत जिंकले 7.5 करोड रूपये


लंडन : 15 वर्षीय जेडन एशमॅनने फर्स्ट फोर्टनाइट वर्ल्ड कपममध्ये दुसरे स्थान प्राप्त करत 7.5 करोड रूपये जिंकले आहेत. फोर्ट नाईट ही एक ऑनलाईन बॅटल गेम आहे. जगभरातील 25 करोड पेक्षा अधिक लोक ही गेम खेळतात.

जेडनने हा खेळ त्याचा साथीदार डेवे जोंग याच्याबरोबर खेळला. दोघांना 15.50 करोड रूपयांपेक्षा अधिक पैसे मिळाले आहेत. जेडन म्हणाला की, माझी आई माझ्यावर नेहमी रागवायची. त्यांना वाटायचे की, मी रूममध्ये बसून 8-8 तास गेम खेळतो. मी वेळ वाया घालवतो. एक वेळातर आईने मला रागामध्ये एक्सबॉक्स (व्हीडीओ गेमचा कंट्रोलर) फेकून मारला होता.

हा ऑनलाईन गेल तीन दिवस चालू होता. याचे आयोजन न्युयॉर्कच्या टेनिस स्टेडिअममध्ये करण्यात आले होते. वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या भागात तब्बल 4 करोड गेमर्सने भाग घेतला होता. याध्ये 30 देशांमधील 100 गेमर्सची निवड करण्यात आली. हे गेमर्स 12 ते 40 वयोगटातील होते.

एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर जेडनची आई म्हणाली की, मला त्याच्यावर अनेकवेळा राग यायचा. त्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होत असे. अनेकवेळा तक्रारी आल्या. मात्र त्याने दाखवून दिले की, तो योग्य होता. ही एवढी मोठी कमाई आहे की, आयुष्यभर नोकरी करून देखील एवढी कमाई केली जाऊ शकत नाही. मी त्याच्या कामगिरीवर खुश आहे.

Leave a Comment