फ्रांसमध्ये सापडले तब्बल 1400 लाख वर्षांपुर्वीचे डायनासॉरचे हाड


जगभरामध्ये खणण करत असताना वैज्ञानिकांना अनेक आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या आहेत. अशीच एक आश्चर्यकारक गोष्ट फ्रांसच्या शेंरेंट येथील आंजेक जंगलात सापडली आहे. येथे खणणाचे काम सुरू असताना, वैज्ञानिकांना 1400 लाख वर्षांपुर्वीचे डायनासॉरचे हाड सापडले आहे. या हाडाचे वजन एवढे आहे की, त्याला उचलण्यासाठी 10 लोकांना बोलवावे लागेल.

वैज्ञानिकांनुसार, हे हाड शाकाहारी डायनासॉर सॉरोपॉडच्या मांडीची आहे. या हाडाचे वजन 499 किलो असून, लांबी 6.6 फूट आहे.

सॉरोपॉड हे जगातील सर्वात विशाल शाकाहारी डायनासॉर होते.  त्यांची मान आणि शेपूट खूप मोठे असायचे तर तोंड छोटे असायचे आणि शरीराचा बाकीचा भाग जाड असायचा.

ज्या ठिकाणी डायनासॉरचे अवशेष सापडले आहेत त्याठिकाणी अनेक जीवाश्म अवशेष आहेत. याआधी देखील 2010 मध्ये याच ठिकाणी सॉरोपॉड डायनासॉरच्या मांडीचे हाड सापडले होते.

2010 नंतर या भागात 7500 हडकं सापडली असून, त्यापैकी 40 टक्के हडकं वेगवेगळ्या प्रजातींच्या डायनासॉरची आहेत.

Leave a Comment