सिंगल स्क्रीन चित्रपटगुहासाठी सरकार देणार मदत


देशात चित्रपटगृहांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकार मदत देणार आहे. विशेषतः निम आणि मध्यम शहरात सिंगलस्क्रीन चित्रपटगृह सुरु करणाऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार आहे असे सूचना प्रसारण मंत्रालयाने जाहीर केले आहे. मंत्रालयाच्या २०१८ च्या आर्थिक सर्व्हेक्षणानुसार देशात सध्या ९६०१ सिनेमा स्क्रीन आहेत. नव्या योजनेचा उद्देश निम शहरी आणि छोट्या शहरात सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे वाढावी असा आहे.

देशात चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वेगाने वाढली आहे. राज्ये आणि केंद्राशासीत प्रदेशातील छोट्या शहरात प्रेक्षकांना मनोरंजनाचा लाभ घेता यावा यासाठी तेथे अधिक प्रमाणात चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी ही प्रोत्साहन स्कीम सुरु केली गेली आहे. सिंगलस्क्रीन सिनेमा हॉल सुरु करणाऱ्यांना ही मदत खूपच उपयुक्त ठरणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे. पूर्वी सिनेमासाठी ३० टक्के करमणूक कर आकारला जात असे पण आता १०० रुपयांपेक्षा अधिक तिकीट असेल तर १२ टक्के आणि त्यापेक्षा कमी तिकीट असेल तर १८ टक्के जीएसटी आकारला जातो त्यामुळे सिनेमा हॉल मालकांना कमी कर भरावा लागत आहे.

Leave a Comment