पुन्हा एकदा अमेरिकेत मोदींचा भव्य सन्मान सोहळा


ह्युस्टन येथील टेक्सास इंडिया फोरम तर्फे येत्या २२ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला जात असून या कार्यक्रमाला किमान ५० हजार प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचे समजते. जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेल्या एनआरजी स्टेडियममध्ये हे सामुदायिक संमेलन होणार असून यासाठी अमेरिकेतील ६५० पेक्षा अधिक सार्वजनिक संस्था काम करत आहेत. साझा सपने, उज्ज्वल भविष्य अशी या कार्यक्रमाची टॅग लाईन आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे मात्र त्यासाठी पास घ्यावे लागणार आहेत. WWW. HOWDYMODI.ORG या वेबसाईटवर त्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

२०१४ मध्ये मोदी जेव्हा प्रथम पंतप्रधान झाले तेव्हा अमेरिकेच्या मेडीसन स्क्वायर मध्ये असाच भव्य कार्यक्रम केला गेला होता त्याला २० हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने जगभरातील देशाना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता असा दुसरा कार्यक्रम अमेरिकेत होत आहे.

Leave a Comment