टीनएजर्सची फेसबुककडे पाठ तर ज्येष्ठ फेसबुकचे क्रेझी


सोशल मिडिया नेटवर्क फेसबुक जगभरात लोकप्रिय झाले असले आणि आजघडीला जगात त्यांचे २ अब्ज युजर्स असल्याचे सांगितले जात असले तरी ईमार्केटर या सल्लागार समितीचे सर्वेक्षण निराळीच स्टोरी सांगते आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे कि १२ ते १९ या वयातील मुले आणि युवा फेसबुककडे पाठ फिरवीत आहेत तर ज्येष्ठ नागरिकांची फेसबुक क्रेझ वाढत चालली आहे.

१६ वर्षे वयाच्या युवांच्या तुलनेत ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक अधिक प्रमाणात फेसबुक वापरत असून त्याचे प्रमाण ६२ टक्क्यांवर गेले आहे. २०१५ मध्ये हे प्रमाण ५८ टक्के होते. त्या तुलनेत १२ ते १७ वयोगटातील फेसबुक युजर्सचे प्रमाण ३९ टक्के आहे. केवळ अमेरिकाच नाही तर अन्य देशातही हाच ट्रेंड दिसून आला आहे.


२००३ मध्ये मार्क झुकेरबर्ग याने फेसमॅश डॉट कॉम नावाने ही साईट तो कॉलेजमध्ये होता तेव्हा सुरु केली पण कॉलेजने ती डिलीट केली होती. त्यानंतर मार्कने लवकरच २००६ मध्ये नवी साईट सुरु केली ती स्टुडंट नेटवर्क साईट म्हणून परिचित होती. तेव्हाच तिचे १ कोटी युजर होते आता हीच संख्या २ अब्जावर गेल्याचा फेसबुकचा दावा आहे.

फेसबुक मधला युवा पिढीचा इंटरेस्ट संपण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. फेसबुक वरील कंटेंट, घरतील ज्येष्ठ व्यक्तींशी नेटवर्क शेअर न करण्याची इच्छा, फेसबुकचा न्यूज आणि मेसेजवर असलेला जोर ही त्यापैकी काही कारणे आहेत. युवा स्नॅपचॅट, इन्स्टाचा वापर अधिक प्रमाणात करत आहेत कारण तेथे इमेज, रोचक कथा आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण नोंदविण्याची संधी त्यांना मिळते आहे असेही या पाहणीत दिसून आले.

Leave a Comment