इस्रायल निवडणुकीत नेत्यानाहूना मोदींचा आधार?


इस्रायल मध्ये लवकरच होत असलेल्या निवडणुकात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेण्याचा प्रयत्न इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू करत आहेत. निवडणुकापूर्वीच मोदी आणि नेत्यानाहू यांचे एकत्र फोटो असलेली पोस्टर इस्रायल मधील बड्या इमारतींवर झळकली आहेत. इस्रायली पत्रकार अमिचाई स्टेन यांनी रविवारी हे फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केले आहेत. येत्या १७ सप्टेंबरला इस्रायल मध्ये सार्वजनिक निवडणुका होत आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे पंतप्रधान बेन्जामिन मेत्यानाहू यांना यंदाची निवडणूक सोपी नाही असे संकेत मिळत आहेत.

निवडणुकांपूर्वी जागतिक बड्या नेत्यांसोबत फोटो बॅनर लावून नेत्यानाहू त्यांच्या मजबूत परराष्ट्र धोरणांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींनी भारतात एकट्याच्या जीवावर भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून दिला असल्याने त्यांचा सहारा घेण्याचा प्रयत्न नेत्यानाहू करत आहेत. मोदींबरोबर त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याच्यासोबतचे फोटोही मोठ्या इमारतीवर लावले आहेत.

यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही अब कि बार मोदी सरकार या नारयाच्या धर्तीवर ट्रम्प सरकारने अब कि बार ट्रम्प सरकार घोषणा दिली होती. भारत आणि इस्रायल या दोन देशात सैन्य, सुरक्षा, राजनीती, कृषी अश्या अनेक क्षेत्रात अधिक जवळचे संबंध आहेत. मोदी नेत्यानाहू यांचे खास दोस्त आहेत. २०१९ च्या निवडणुकात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मोदींचे सर्वप्रथम अभिनंदन करणारे नेत्यानाहू हे पहिले परदेशी पंतप्रधान होते.

Leave a Comment