जगातील सर्वात महाग घोडा, किंमत ऐकून आश्चर्यचकित व्हाल !


तुम्ही एकापेक्षा एक महागड्या पाळीव प्राण्यांविषयी ऐकले असेल.  ते पाळीव प्राणी देखील एवढे खास असतात की, त्यांच्या किंमती देखील करोडो रूपयांमध्ये असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या प्राण्याविषयी सांगणार आहोत. या प्राण्याची किंमत वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या जगातील सर्वात महाग घोड्याच्या किंमतीत तुम्ही एक अलिशान बंगला, गाडी आणि बरचं काही विकत घेऊ शकता.

या घोड्याचे नाव ग्रीनमंकी असून, तो एक अमेरिकन रेस हॉर्स आहे. धावण्याची क्षमता आणि सुंदरता या घोड्याला खास बनवते. त्यामुळेच या घोड्याच्या नावावर आजपर्यंत जगातील सर्वात महाग प्राणी असल्याच्या विक्रम कायम आहे.

सांगण्यात येते की, जेव्हा हा घोडा पहिल्यांदा रेसमध्ये धावला, त्यावेळी त्यांनी 8 मैलाचे अंतर केवळ 9.8 सेंकदामध्ये पुर्ण केले होते. मात्र एकदा गंभीररित्या जखमी झाल्यानंतर हा घोडा पुन्हा कधीच धावू शकला नाही.

दोन वर्षांचा असताना या घोड्याची किंमत तब्बल 16 मिलियन डॉलर अर्थात 110 कोटी रूपये एवढी होती.  आतापर्यंत एवढी किंमत कोणत्याही प्राण्याला मिळालेली नाही. मात्र जुलै 2018 मध्ये या जगातील सर्वात महाग प्राण्याचा मृत्यू झाला.

ग्रीनमंकीचे मालक असलेले हार्टली म्हणाले की, हा जगातील एकमेवद्वितीय घोडा होता. त्याच्या किंमतीने आमचे आयुष्यच बदलून टाकले.

त्याच्या मालकांनी सांगितले की, आम्ही दुखापतीनंतर त्याला व्यवस्थित करण्यासाठी सर्वकाही केले. चार वर्षांपासून त्याला अनेक अडचणी येत होत्या. मात्र मागील सहा महिन्यात मात्र परिस्थिती आणखीनच खालवली. त्यामुळे आम्ही योग्य तो निर्णय घेतला. त्या घोड्याला मृत्यूनंतर शेतामध्ये दफन करण्यात आले.

 

Leave a Comment