केवळ 3 मिनिटात 720 किलो सोने घेऊन दरोडेखोर फरार


ब्राजीलच्या साओ पोलो आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 बंदुकधारी दरोडेखोरांनी तीन मिनिटांमध्ये 30 मिलियन डॉलरचे सोने लुटले आहे. या घटनेला ब्राझीलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी चोरी असल्याचे सांगितले जात आहे.

विमानतळावर पोलिस पोहचताच दरोडेखोर पळून गेले. कॅमेऱ्यामधून दिसून येते की, त्यांनी मास लावले होत तसेच ते कार्गो टर्मिनलच्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर देत आहेत.

सोने न्युयॉर्कवरून ज्युरिख येथे घेऊन जाण्यात येत होते. पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांनी 720 किलो सोने चोरले असून, त्याची किंमत जवळपास 30 मिलियन डॉलर आहे.

पोलिस चीफ जोओ कार्लोस मिगेल हुएब यांनी सांगितले की, एका संघटित गँगने हे काम केलेले असून, ही निश्चितच त्यांची पहिली चोरी नाही. सध्यो पोलिस विमानतळावरील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.

ब्राझीलमध्ये याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. देशातील सर्वात मोठा दरोडा 2005 मध्ये पडला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी एका बँकेत दरोडा टाकत 67 मिलियन डॉलर लुटले होते. 2017 मध्ये देखील सॅमसंग फॅक्टरीमधून लाखो डॉलर लुटल्याची घटना घडली होती.

तसेच दरोडेखोरांनी पोलिसांची कपडे घालून हा गुन्हा केल्याचे सांगितले जात असून, याशिवाय विमानतळावरील एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचे माहिती मिळवण्यासाठी अपहरण केले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment