अ‍ॅपल वॉचमुळे वाचले व्यक्तीचे प्राण


अ‍ॅपल वॉच पुर्ण जगामध्ये आपल्या वेगळेपणामुळे ओळखले जाते. अ‍ॅपल वॉचने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करत ब्रिटनमधील एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. अ‍ॅपल वॉचने ब्रिटिश नागरिक पॉल हट्टनला अलर्ट पाठवला की, त्यांच्या ह्रदयाचे ठोके एकदम कमी होत आहेत. अलर्टनंतर पॉलला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले, जेथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.

पॉल एक टेक्नोलॉजीचे लेखक असून, ते इंग्लंडच्या एक्सेस येथे राहतात. त्यांना अ‍ॅपल वॉचवर त्यांच्या ह्रदयाचे ठोके कमी होत असल्याचे अलर्ट सतत मिळत होते. त्यांनतर ते हॉस्पिटलमध्ये भर्ती झाले. रिपोर्टनुसार पॉल यांच्या ह्रदयाची गती 40 बीट प्रती मिनिटांपेक्षा कमी झाली होती.

ही पहिलीच घटना नाही की, अ‍ॅपल वॉचमुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचले असतील. याआधी देखील एका रेडिट युजर्सने दावा केला होता की, अ‍ॅपल वॉचने त्याचे प्राण वाचवले होते. युजर्सच्या ह्रदयांच्या ठोक्यात सतत उतार-चढाव येत होता. ज्याबद्दल वॉच अलर्ट पाठवत होते मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनंतर बेशुध्द अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. तेथे त्यांना टैचीकार्डिया असल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या ह्रदयाच्या ठोके 100 बीपीएम पेक्षा अधिक गतीने पडत होते.

याचप्रकारे, याचवर्षी फेब्रुवारीमध्ये नॉर्वेच्या तोरलव ओस्टवांग या 67 वर्षीय व्यक्तीचे अ‍ॅपल वॉच 4 ने प्राण वाचवले होते. तोरलव बाथरूममध्ये पडले होते व बेशुध्द झाले. मात्र ते पडताच अ‍ॅपल वॉचने इमरजेंसी अलर्ट पाठवले होते. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अ‍ॅपल वॉचमध्ये फॉल डिटेक्शन फिचर आहे. ज्यामुळे पडल्यानंतर वॉच इमरजेंसी नंबरवर स्वतः फोन करते.

अ‍ॅपल वॉच 4 मध्ये फॉल डिटेक्शनबरोबरच ईसीजी फिचर देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हा ईसीजी करण्याची गरज नाही. तुम्ही अ‍ॅपल वॉचद्वारेच ईसीजी रिपोर्ट काढून डॉक्टरांना दाखवू शकता. मात्र सध्या भारतात उपलब्ध असलेल्या अ‍ॅपल वॉचमध्ये हे फिचर नाही.

Leave a Comment