गौरी खानला ‘त्या’ फोटोवरून नेटकऱ्यांनी झापले


सध्याच्या घडीला मालदीवमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सुट्टी एन्जॉय करत आहे. गौरी सोशल मीडियावर या सुट्टीच्या काळातील अनेक फोटो शेअर करत आहे. त्यातच गौरीने काही दिवसांपूर्वी एक प्राचीन कलाकृती असलेल्या पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. पण काही नेटकऱ्यांनी गौरीला हा फोटो अश्लील असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे.

गौरी एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर असल्यामुळे घर सजवतांना ती अनेक वेळा क्रिएटीव्ह काही तरी करायचा प्रयत्न करत असते. यात तिचा भर कलाकृतींकडे जास्त असतो. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये याचाच प्रत्यय दिसून आला. एक पेंटींग तिने ट्विटरवर शेअर केले होते. तिने ही पोस्ट करत ब्लॅक ड्रामा #robertoferri #interiordesign #design #decor”, असे कॅप्शन दिले होते. पण हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

गौरीच्या घरातील हा फोटो असून एक उत्तम कलाकृती पेंटिंगच्या माध्यमातून रेखाटल्याचे तिचे मत होते. पण हे काही नेटकऱ्यांना पटले नाही. गौरी या पेंटिंगच्या माध्यमातून न्युडिटीला प्रमोट करत असल्याचे काही युजर्सने म्हटले. तर तिला हा फोटो अश्लील असल्याचे अनेकांनी सांगितले.

तुला वेड लागले आहे का? असे फोटो आपल्या घरामध्ये कोणी लावते का? तुम्ही एक आई आहात. विचार करुन डिझाइन करत जा, असं एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर मला माहित आहे की तुम्ही पुढारलेल्या आणि नव्या विचारसरणीच्या आहात. पण असे फोटो किंवा पेंटिंग घरात लावणे योग्य नसल्यामुळे शाहरुखचे नाव खराब होऊ शकते. ही तर अश्लीलतेची हद्दच असल्याचे अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे.