जगातील पहिलेवहिले अंडरवॉटर मिलिट्री म्युझियम बनले केवळ 7 दिवसात


जगातील पहिलेवहिले अंडरवॉटर मिलिट्री म्युझियम जॉर्डन येथे बनवण्यात आले आहे. हे म्युझियम दक्षिणी जॉर्डन येथील लाल समुद्रात 92 फुट खोल अंतरावर बनवण्यात आले आहे. सैनेने येथे युध्द टँक, सैन्य अम्ब्युलंस, हॅलिकॉप्टर, युध्द विमान, क्रेन आणि एंटी एअरक्राफ्टबरोबरच 19 सैन्य उपकरणे ठेवली आहेत. खास गोष्ट म्हणजे हे म्युझियम केवळ 7 दिवसात बनले आहे.

अकाबा स्पेशल इकोनॉमी झोन अथॉरिटीने सांगितले की, थोड्या थोड्या कालावधीनंतर येथे प्रदर्शन भरवले जाईल. याचे कारण आहे की, लोकांना म्युझियम बघून विशेष वाटले पाहिजे. लोक समुद्री जीवांबरोबरच सैन्य वापरत असलेली उपकरण देखील बघतील. म्युझियमची परियोजना बनताना ध्यानात ठेवले गेले आहे की, स्कॅनिग, फोटो काढल्यामुळे समुद्र जीवांवर काही प्रभाव पडता कामा नये. जमीनीपासून 15 ते 20 मीटर अंतरावर सैन्याच्या उपयोगी उपकरणे लावण्यात आली आहेत तर अन्य 11 उपकरणे 20 ते 28 मीटर अंतरावर लावण्यात आलेली आहेत.

एएसईजेडएने सांगितले की, संबंधीत आधिकाऱ्यांशी चर्चा करून समुद्री पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ते उपाय केले जातील. लोक बोटीद्वारे येथे पोहचू शकतात. मात्र स्कूबा डायविंग ड्रेस घालूनच करावी लागेल.

Leave a Comment