वर्तमानपत्राच्या विक्री वाढीसाठी सुरु झाली होती टूर द फ्रांस रेस


जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेची व जुनी सायकल रेस टूर द फ्रान्स १९०३ साली प्रथम सुरु झाली आणि यावर्षी तिचा १०६वा सिझन येत्या २८ जुलैला संपन्न होत आहे. विशेष म्हणजे १९०३ साली लो ऑटो या वर्तमानपत्राची विक्री वाढावी या उद्देशाने अश्याप्रकारची सायकल रेस घ्यावी असा निर्णय घेतला गेला होता. कारण १९०० च्या आसपास फ्रांस मध्ये सायकल रेस खूप लोकप्रिय होत्या. त्यानंतर दरवर्षी जुलै मध्ये ही रेस घेतली जात आहे.


ही मल्टीपल स्टेज सायकल रेस ३४८० किमी अंतराची असून त्यात २१ स्टेज असतात. यंदा या रेससाठी १८ कोटींचे इनाम ठेवले गेले असून विजेत्याला ३.८ कोटीचे इनाम मिळणार आहे. यंदा फ्रांसचा ज्युलियन एनाफिलीप १८ स्टेजनंतर पहिल्या नंबरवर आहे. ही रेस इंटरनॅशनल वर्ल्ड रेसचा भाग असून दरवर्षी या रेसची सुरवात वेगवेगळ्या ठिकाणाहून होते मात्र तिचा शेवट फ्रान्सच्या पॅरीस मध्ये होतो. यात प्रत्येक स्टेजचा विजेता वेगळा असतो आणि सर्व विजेत्यांना लागलेला वेळ एकत्र करून अंतिम विजेता ठरविला जातो. त्याला यलो जर्सी दिली जाते.

यंदा युरोप मध्ये उन्हाळा खूप आहे. तापमान ३९ डिग्रीवर पोहोचल्याने स्पर्धक शरीर थंड ठेवण्यासाठी बर्फ भरलेली प्लास्टिक जॅकेट वापरत आहेत. यंदा सर्वात कमी स्टेज २७.२ किमी ची असून सर्वाधिक अंतर २३० किमी आहे.

Leave a Comment