अॅपलने खरेदी केला इंटेल मोडेम डिव्हिजनचा हिस्सा


अॅपल इंकने १ अब्ज डॉलर्स म्हणजे ६९०० कोटी रुपये मोजून इंटेल मोडेम डिव्हिजनमधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. या संदर्भात करार झाल्याची घोषणा दोन्ही कंपन्यांनी गुरुवारी केली. अॅपलचा हा दुसरा मोठा सौदा ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये कंपनीने ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजे २२ हजार कोटी खर्चून बीटल इलेक्ट्रोनिक्सची खरेदी केली होती.

इंटेलच्या मोडेम डिविजन खरेदीमुळे अॅपलला मोठा फायदा होणार आहे. मोडेम चीप आयफोन सारख्या डिव्हायसेसला वायरलेस डेटा नेटवर्कने कनेक्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र या साठी आत्तापर्यंत अॅपल पुरवठादारांवर अवलंबून होते. इंटेल मोडेम चीप डिव्हिजन खरेदीमुळे कंपनी स्वतः स्मार्टफोन चीप बनवू शकणार आहे. स्मार्टफोन मधील या महत्वाच्या सुट्या भागाचे उत्पादन स्वतः केल्याने अॅपलचे वर्चस्व वाढणार आहे. या खरेदीमुळे अॅपलच्या वायरलेस टेक्नोलॉजी पेटंटची संख्या १७ हजारावर पोहोचली आहे. दोन्ही कंपन्यात झालेल्या करारानुसार इंटेलची बौद्धिक संपदा मालकी, उपकरणे व लीज अॅपलच्या वाट्याला आले आहे. इंटेलमधील या विभागातील २२०० कर्मचारी सुद्धा आता अॅपलचा हिस्सा असतील.

सॅमसंग, हुवावे या कंपन्या स्वतःच मोडेम चीप बनवितात त्यात आता अॅपलचा समावेश झाला आहे.

Leave a Comment