अमेरिकेत पुन्हा दिली जाणार मृत्युदंडाची शिक्षा


गेली वीस वर्षे अमेरिकेत बंद केली गेलेली मृत्युदंडाची शिक्षा आता पुन्हा सुरु केली जात असून पुढील वर्षात पाच गुन्हेगारांसाठी ही शिक्षा अमलात आणली जाणार आहे. या पाच जणांना कधी मृत्युदंड दिला जाणार त्याच्या तारखा ठरविल्या गेल्या आहेत. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विलियम बर्र यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार न्याय मंत्रालयाकडे या ५ खुन्यांसह अन्य सर्व धोकादायक गुन्हेगारांना मृत्युदंड देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षा सुनावली जाताना प्रत्येक आरोपीची निष्पक्ष सुनावणी करूनच त्यांना दोषी ठरविले गेले होते.

बर्र यांच्या म्हणण्यानुसार न्याय मंत्रालयाने कायद्याचे पालन करताना पिडीत परिवारांना न्याय मिळावा यासाठी दोषींना सुनावलेली शिक्षा अमलात आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ड्रग माफिया, मास शूटर्स यांना मृत्युदंड देता यावा यासाठी बर्र यांनी न्याय विभागाच्या प्रोटोकोल मध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले गेल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार डेनियल लेविस ली, लेजमंड मिशेल, वेस्ली इरापुर्के, आल्फ्रेड बुर्जुआ व डस्टीन ली हे खून, लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या पाच क्रूर गुन्हेगारांना अनुक्रमे ९ डिसेम्बर, ११,१३ डिसेम्बर २०१९, १३ डिसेम्बर २०२० व १५ जानेवारी २०२१ मध्ये मृत्युदंड दिला जाणार आहे.

Leave a Comment