अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी चीन सोडून भारतात येणार


अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरचा परिणाम चीन मध्ये उत्पादन प्रकल्प असलेल्या अनेक अमेरिकी कंपन्यांना जाणवू लागला असून चीन मधून बस्तान हलविण्यास अनेक कंपन्यांनी प्राधान्य दिले आहे. अमेरिकेची दिग्गज टॉय कंपनी हेस्ब्रो या कारणामुळेच चीन मधील त्यांच्या कारभार गुंडाळून भारत आणि व्हिएतनाममध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरु करणार असल्याचे समजते.

हेस्ब्रोकडे फ्रोजन आणि अव्हेंजर्स या प्रसिद्ध ब्रांडचे परवाने आहेत. कंपनीचे सीइओ ब्रायन गोल्डनर यांनी एका कॉन्फरन्स मध्ये माहिती देताना सांगितले, चीनमध्ये अमेरिकन कंपन्यानी उत्पादन ५० टक्के कमी केले आहे आणि त्या त्यांच्या उत्पादन प्रकल्पासाठी जगातील नवीन बाजारांचा शोध घेत आहेत. चीन मध्ये अजूनही कमी मजुरी आणि उत्तम उत्पादन क्षमता आहे मात्र ट्रेड वॉर मुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चीन मध्ये तयार झालेल्या मालावर अमेरिकेने अत्यंत शुल्क वाढविले असून त्यामुळे कंपन्यांच्या महसुलावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी चीन मधून बाहेर पडणे हाच एक मार्ग सध्या तरी आमच्यापुढे आहे.

Leave a Comment