हा आहे रिमोटने कंट्रोल होणारा जगातील पहिला कुत्रा


कुत्र्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागत असतात. मात्र आता कुत्र्यांना रिमोटच्या साह्याने कंट्रोल केले जाणार आहे. इस्रायलच्या बेन-गुरियन विद्यापीठाने अशी सिस्टिम तयार केली आहे, जे वायब्रेशनच्या मदतीने कुत्र्यांना संदेश पाठवते. ‘ताई’ नावाचा हा पहिला कुत्रा आहे ज्याच्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे. ताई आवाजापेक्षा डिवाईसने पाठवलेला संदेश सहज समजतो.

ताईचे वय 6 वर्ष आहे. हा लेब्रोडोर आणि जर्मन शेफर्डची क्रोसबीड आहे.  व्यक्तीच्या सुचना समजाव्या यासाठी त्याला खासप्रकारचे जँकेट घालण्यात आले आहे. त्यात लागलेल्या सेन्संरने वायब्रेशन निर्माण होते. ते वायब्रेशन भाषेप्रमाणे कार्य करते. ते त्याला सांगते की, त्याचा मालक त्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

संशोधकांचा दावा आहे की, कुत्र्यांना कंट्रोल करणारे हे सिस्टम जे लोक चालू शकत नाही अथवा प्राणी ज्यांच्या डोळ्यासमोर नसतात अशा लोकांना फायदेशीर ठरू शकते. मिलिट्री आणि रेस्क्यु मिशनमध्ये असलेल्या कुत्र्यांसाठी देखील ही सिस्टिम फायदेशीर ठरू शकते.

कुत्र्याला घालण्यात आलेल्या जँकेटमध्ये पुढे व मागे 4 छोटे वायब्रेशन बटन लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक बटनचा अर्थ वेगळा आहे. त्यामध्ये उडी मारणे, खाली बसणे, जवळ येणे आणि पाठीमागे जाणे यासाठी रिमोटद्वारे वायब्रेशन बटनला अलर्ट केले जाते.  त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बटनाप्रमाणे ट्रेनिंग देखील देण्यात आली आहे.

विद्यापाठीतील रोबोटिक्स लायब्रेरीचे डायरेक्टर प्रो. आमिर शेपिरो यांच्यानुसार, आतापर्यंतच्या संशोधनामध्ये समोर आले आहे की, बोलण्यापेक्षा वायब्रेशनद्वारे करण्यात आलेला संवाद कुत्रे लवकर समजतात. काही दिवसांपुर्वीच या कॉन्सेप्टला जापानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड हेप्टिक कॉन्फ्रेंसमध्ये सादर करण्यात आले होते. लवकरच दुसऱ्या प्रजातीच्या कुत्र्यांवर याचा प्रयोग केला जाणार असून, त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिले जाईल.

Leave a Comment