तुलसी गैबार्ड यांनी गुगलविरूध्द दाखल केली 345 करोड रूपयांची याचिका


अमेरिकेच्या डैमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार तुलसी गैबार्ड यांनी गुगलविरूध्द 345 करोड रूपयांची याचिका दाखल केलू आहे. 2020 च्या निवडणूक प्रचारात भेदभाव करण्याबरोबरच त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याला बाधा आणण्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ भारतीय वंशाच्या तुलसी या अमेरिकन कॉग्रेसमधील पहिल्या हिंदू सदस्या आहेत.

38 वर्षीय गैबार्ड यांची ओळख इराक युध्दातील त्यांच्या कुशल अभियानासाठी आहे. हवाई येथून 2 वेळा खासदार असणाऱ्या तुलसी यांनी लॉस एंजिलस येथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये आरोप करण्यात आले आहे की, गुगलने त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याला बाधा आणली आहे. गुगलने जूनमध्ये त्यांच्या पहिल्या डैमोक्रेटिक डिबेटनंतर त्यांच्या कँम्पनेशी संबंधीत जाहिरात अकांउट काही काळासाठी बंद केले होते.

तुलसी यांच्या कँम्पेन कमिटीचे म्हणणे आहे की, गुगलने त्यांच्या जाहिरात अकाउंटला 27 जूनला 6 तासांसाठी सस्पेंड केले होते. 28 तारखेला देखील असेच झाले. अकाउंट सस्पेंड झाल्याने सामान्य नागरिकांपर्यंत पोहचणे आणि त्यांना मिळणाऱ्या फंडवर मोठा प्रभाव पडला.

याचिकेमध्ये गुगलबद्दल तुलसी यांच्या कँम्पेन कमिटीने लिहिले की, गुगलच्या या भेदभावामुळे गैबार्ड यांच्या प्रचारावर परिणाम झाला आहे. कंपनी आपल्या क्षमतेचा वापर राजकीय मतभेदांसाठी करत आहे. हे एकप्रकारे 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचे काम आहे.

गैबार्ड या पहिल्या हिंदू आहेत, ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये त्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

Leave a Comment