पतीने पत्नीला गिफ्ट केला अ‍ॅमेझॉनच्या डिल्हिवरी बॉक्सच्या आकाराचा केक


ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचा वापर आपण ऑनलाईन वस्तू खरेदीसाठी करतो. अ‍ॅमेझॉनवरून आपण आपल्या दैनदिन वापराच्या वस्तू मागवतो अथवा आपल्या ओळखीच्या खास लोकांना वस्तू गिफ्टस करतो. मात्र अ‍ॅमेझॉनविषयी असलेले वेड तुम्ही या आधी कधीच पाहिले नसेल. पतीने आपल्या पत्नीला वाढदिवसादिवशी खास अ‍ॅमेझॉनच्या डिल्हिवरी बॉक्सच्या आकाराचा केक गिफ्ट दिला आहे. इरिक मॅकग्युरी नावाच्या या महिलेच्या पतीने नॉर्थ कॅरिलोना येथून स्वीट ड्रीम्स बेकरीमधून अ‍ॅमेझॉनच्या डिल्हिवरी बॉक्सच्या आकाराचा केक बनवून घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः इरिक मॅकग्युरीने फेसबूकवर पोस्ट टाकत दिली.

You know you order from Amazon a little too much if your husband gets this cake…😂 Amazon.com Sweet Dreams Bakery of Dunn

Posted by Emily McGuire on Friday, July 19, 2019

इरिकने फेसबूक पोस्टमध्ये लिहिले की, तुम्हाला माहिती आहे लोकांना अ‍ॅमेझॉन आवडते, मात्र तुमच्या पतीने तुम्हाला त्याचा केकच गिफ्ट केला तर. या केकचा फोटो फेसबूकवर पोस्ट केल्यानंतर 19,000 लोकांनी शेअर केला आहे तर 16,000 पेक्षा अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावर कमेंट्स करणाऱ्या एका महिलेने लिहिले की, मला देखील असाच केक हवा आहे. तर एका मुलीने आपल्या आईसाठी असा केक ऑर्डर करणार असल्याचे सांगितले.

हा केक बनवण्यासाठी स्वीट ड्रीम्स बेकरीचे मालक ट्रेना नोरीसला आठ तास लागले. याच्या लेबल आणि टेब बनवण्यासाठी साखर आणि वेफर पेपरचा वापर करण्यात आला. नोरीस म्हणाली की, ही ऑर्डर मिळाल्यानंतर मी उत्साही झाले. मला असा नवीन प्रयोग करायचा होता.

Leave a Comment