पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत चांद्रयान-2 चा यशस्वी प्रवेश


नवी दिल्ली – 22 जुलैला (सोमवारी) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या चांद्रयान – 2 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे यान श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन अंतराळात झेपावले. दरम्यान, पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत आता या यानाने यशस्वी प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने ट्विट करुन दिली.

24 जुलैला पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत भारताच्या चांद्रयान – 2 ने प्रवेश केल्यानंतर आज (शुक्रवारी) मध्यरात्री 1 वाजता या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. दरम्यान 29 जुलैला हे यान पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्त्राने ट्विट करुन दिली.

इस्त्रोच्या चांद्रयान – 2 यानाचा वेग पाहता या यानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 48 दिवसाचा कालावधी लागणार आहे. सद्य स्थितीत या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे.