आर्मस्ट्राँग यांची चुकीची सर्जरी केल्याने हॉस्पिटलला द्यावे लागले 60 लाख डॉलर


चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे एस्ट्रोनॉट नील आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू होऊन 7 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आता त्यांच्या निधनाबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार, आर्मस्ट्राँग यांच्या मृत्यूच्या दोन वर्ष आधी सर्जरी करणाऱ्या हॉस्पिटलकडून त्यांच्या कुटूंबला 60 लाख डॉलर (41 करोड रूपये) मिळाले होते. दावा करण्यात येत आहे की, आर्मस्ट्राँगच्या कुटूंबाने चुकीची सर्जरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हॉस्पिटलचे नाव खराब होण्याच्या भितीने कोणत्या पुराव्या अभावी आर्मस्ट्राँग यांच्या मुलांना ही रक्कम दिली.

अपोलो मिशन अंतर्गत 1969 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणारे आर्मस्ट्राँग यांचा 12 ऑगस्ट 2012 ला मृत्यू झाला होता. त्याआधी दोन आठवड्यांपुर्वीच त्यांचा बायपास सर्जरी सिनसिनाटी येथील मर्सी हेल्थ फेयरफिल्ड येथे झाली होती.  मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबाने दावा केला की, आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू कार्डियोवेस्कुलर प्रोसीजर्समधील जटिलतेमुळे झाला आहे. यादरम्यान आर्मस्ट्राँगच्या मार्क आणि रिक या दोन मुलांनी हॉस्पिटलवर आरोप केला होता की, सर्जरीमध्ये झालेल्या गडबडीमुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दोघांनी हॉस्पिटलविरूध्द तक्रार देखील दाखल केली होती.

तसेच टाईम्सने दावा केला आहे की, अज्ञात स्त्रोतांकडून कोर्टात दाखल केलेले 93 पानांचे कागदपत्र मिळाली आहेत. यामध्ये आर्मस्ट्राँग यांच्या कुटूंबाचे आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या संभाषणांचा भाग आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, आर्मस्ट्राँग यांची तब्येत 7 ऑगस्ट 2012 खुप खराब झाली. त्यानंतर डॉक्टरांना त्यांची तात्काळ सर्जरी करावी लागली. डॉक्टरांनी त्यांचे ह्रदयाचे ठोके वाढवण्यासाठी अस्थाई वायर वायर लावले होते. मात्र एका नर्सच्या चुकीमुळे वायर हलल्या व ऑर्मस्ट्राँग यांचे ब्लड प्रेशर कमी झाल्याने इंटरनल ब्लिडींगमुळे त्यांचा मृत्यू झाला.

कागदपत्रांनुसार, त्यानंतर डॉक्टरांनी घडबडीत निर्णय घेतले व त्यांना ऑपरेशन थेएटरमध्ये नेण्यास उशिर झाला. याच प्रकरणासंबंधी आर्मस्ट्राँग यांच्या पत्नी वैंडी यांनी हॉस्पिटलला मेल केला होता की, त्यांचा मुलगा अपोलो मिशनच्या 45 व्या वर्षी खराब मेडिकल सुविधेबाबत खुलासा करेल. तसेच आर्मस्ट्राँग यांच्या नातीच्या वकिलांनी देखील या प्रकरणामध्ये दखल दिली होती. तसेच ते म्हणाले होते की, कोणतीही संस्थेला अमेरिकन हिरो च्या मृत्यूशी आपले नाव जोडलेले असावे असे वाटणार नाही.

रिपोर्टनुसार, मर्सी हॉस्पिटलने आर्मस्ट्राँगच्या कुटूंबाने व्यवस्थापनाबद्दल केलेले दावे नाकारले होते. तरी देखील हॉस्पिटलने हे प्रकरण शांत करण्यासाठी त्यांना 60 लाख डॉलर सेटलेमेंट स्वरूपात दिले होते. जेणेकरून हे प्रकरण सार्वजनिक होणार नाही व हॉस्पिटलचे नाव खराब होणार नाही.

Leave a Comment