जंगल वाचवण्यासाठी 800 किलोमीटर उलटा चालणार हा व्यक्ती


पर्यावरण वाचवण्यासाठी 46 वर्षीय मेदी बेस्तोनी ईस्ट जावा येथील डोनो गावापासून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता पर्यंत 800 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे तो हे अंतर उलटे चालत पुर्ण करणार आहे. मेदीने देशातील जंगले वाचवण्यासाठी व लोकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यांना हे अंतर पुर्ण करण्यासाठी 150 तासांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. हे अंतर गाडीने पुर्ण करण्यासाठी 10 तास लागतात.

मेदी यांचा उलटे चालण्याचा हा प्रवास 18 जुलैला सुरू झाला आहे. तो घरून एक बँग आणि तीन लाख रूपये घेऊन निघाला. त्यांना आशा आहे की, 17 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी नॅशनल पॅलेज पोहचून राष्ट्रपती जोको विदादो यांची भेट घेऊ शकेल. तो यावेळेस विदादो यांना माउंट विलिसवर लावण्यासाठी एक छोटे झाड देखील देणार आहे, जेणेकरून बाकी लोक देखील याने प्रभावित होऊन, झाडे लावतील.

मेदी सांगतात की, ‘1970 च्या तुलनेत इंडोनेशियातील जंगलांमध्ये झाडांची संख्या अर्धी झाली आहे. दरवर्षी कागद, प्लायवूड आणि पाम ऑयल बनवण्यासाठी लाखो हेक्टर झाडे कापली जातात. हा मुद्दा इंडोनेशियाचा नाही, संपुर्ण जगाचा आहे. पर्यावरण वाचवायचे असेल तर आता पाऊल उचलणे गरजचेचे आहे.’

मेदी दररोज 30 किलोमीटर पायी चालत आहेत. या प्रवासादरम्यान डोक्यावर जापानी हँट घालतात. त्यावर प्लॅस्टिकच्या पाईपपासून बनलेले एक मोठी हँट आहे. यावर एक रियर व्यू असणारा आरसा लावण्यात आलेला आहे, जेणेकरून त्यांना आजुबाजूच्या गोष्टी दिसतील. मेदी प्रवासादरम्यान रात्री मस्जिद, पोलिस स्टेशन, सिक्युरिटी चेकपोस्टला थांबतो.

तो सांगतो की, ‘नाष्टा आणि जेवण हे रोडच्या बाजूला असलेल्या दुकानावरच करतो. त्यांना हे अंतर पुर्ण करण्यासाठी 30 ते 40 दिवस लागणार आहेत. तो सांगतो की, मला विश्वास आहे की, मी 17 ऑगस्टपर्यंत जकार्ता पोहचेल. याआधी देखील मेदी 2016 मध्ये एका पर्यावरण मोहिमेसाठी उलटे चालत जावा राज्य फिरला आहे.’

Leave a Comment