दोन भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळात शोधले 28 नवीन तारे


इस्त्रो चांद्रयान-2 चंद्रावर पाठवण्याची तयार करत असताना त्याचदिवशी नैनीताल जवळील देवस्थल येथील दोन वैज्ञानिकांनी सुदूर अंतराळात नवीन ताऱ्यांचा शोध घेत होते व ते त्यात यशस्वी देखील झाले आहेत. या वैज्ञानिकांनी 57000 प्रकाश वर्ष लांब असलेल्या ग्लोब्यूलर क्लस्टर एनजीसी 4147 मध्ये 28 वेरिएबल ताऱ्यांचा शोध लावला आहे. पहिल्यांदाच क्लस्टरमध्ये ताऱ्यांचा शोध लागला आहे. आर्यभट्ट रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ ऑब्जर्वैशनल सायजेसचे खगोल शास्त्रज्ञ डॉ. एके पांडे आणि डॉ स्नेहलता यांच्या नेतृत्वाखालील टीमने अपेक्षाकृत लहान ग्लोब्लूटर क्लस्टर एनजीसी 4147 मध्ये फोटोमॅट्रिक प्रेक्षणद्वारे प्राप्त चित्रांचे विश्लेषणकरून या क्लस्टरमध्ये 28 ताऱ्यांचा शोध लावला आहे.

या शोधामध्ये ताऱ्यांचा शोध लावण्याबरोबरच एनजीसी 4147 च्या अंतराळातील संरचनेबद्दल देखील महत्त्वपुर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात या ताऱ्यांबद्दल आणखी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. हे क्लस्टर पृथ्वीपासून 57000 प्रकाश वर्ष लांब असल्याचे देखील अनुमानित करण्यात आले आहे. वैज्ञानिकांच्या शोधाबद्दल विस्तृत निष्कृष प्रसिध्द जर्नल एस्ट्रोनॉमिकल जर्नलच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकात प्रकाशित होणार आहे.

डॉ. पांडे यांनी सांगितले की, ग्लोब्यूलर क्लस्टर एक उपग्रह असून, गेलेक्टिक कोरची परिक्रमा करणाऱ्या ताऱ्यांचा गोलाकार समूह आहे. ग्लोब्यूलर क्लस्टरच्या गुरूत्वाकर्षणामुळे मध्यभागात ताऱ्यांचे घनत्व अधिक असते. स्टार क्लस्टरच्या या श्रेणीचे नाव लॅटिन शब्द ग्लोब्युलस म्हणजे छोटा आकार असे घेण्यात आले आहे. ग्लोब्यूलर क्लस्टर आकाशगंगेमधील प्रभामंडळात सापडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खूज जून तारे असतात. देवस्थल टेलीस्कोद्वारे शोधण्यात आलेल्या ताऱ्यांची चमक सतत बदलत असते. चमक बदलल्याने त्यांचे पसरणे किंवा आक्रसने, अथवा चमक कमी होणे वाढणे हे त्यांच्या जवळील पिंडाला लागलेल्या ग्रहणामुळे होऊ शकते.

देवस्थल येथे 3.6 मीटरचा डीओटी (देवस्थल ऑप्टिकल टेलीस्कोप) आशियाचा सर्वात मोठा रिफ्लेक्टिव टेलीस्कोप आहे. चार टन पेक्षा अधिक वजनाची काच आणि 32.4 मीटर फोकल लेंथ असणाऱ्या या टेलिस्कोपची स्थापना 2016 मध्ये बेल्जियमच्या मदतीने करण्यात आली होती. याचे उद्घाटन 31 मार्च 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांनी ब्रुसेल्स येथून केले होते.

Leave a Comment