पोलिसांसाठी फिटनेस मॉडेल ठरलेल्या आयपीएसची क्रेझ अजूनही कायम


बॉलीवूडमध्ये दबंग पोलीस अधिकारी दाखविणारे सिम्बा, सिंघम चित्रपट तुफान लोकप्रिय ठरले असले तरी एका खऱ्याखुऱ्या आयपीएसची क्रेझ अजूनही कायम आहे. पोलिसांसाठी फिटनेस मॉडेल ठरलेला हा अधिकारी देखणेपणातही अनेक बॉलीवूड अभिनेत्यांचा बाप ठरला आहे. २०१८ मध्ये सोशल मिडीयावर अचानक व्हायरल झालेल्या या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे सचिन अतुरकर. आजही या अधिकाऱ्यांचे इन्स्टाग्राम, फेसबुकवर प्रचंड संख्येने फॉलोअर्स आहेत.

सचिन यांचा जन्म भोपाळचा. ३४ वर्षीय सचिन यांनी युपीएससीची परीक्षा २२ व्या वर्षी पहिल्या झटक्यात उत्तीर्ण केली होती. सध्या ते उज्जैन येथे पोस्टिंगवर असून त्याच्या वेलबिल्ट बॉडी मुळे आणि अतिशय देखणेपणामुळे चर्चेत आहेत. केवळ फिटनेस हेच त्यांचे वैशिष्ट नाही तर ते उत्तम क्रिकेटपटू आहेत आणि घोडेस्वारीत सुवर्णपदक विजेते आहेत. स्थानिक क्रीडा कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी होतात आणि स्थानिक लोकांशी नेहमी संपर्कात असतात.


२०१८ मध्ये ते एकदम चर्चेत आले ते त्यांच्यावर फिदा झालेली एक मुलगी पंजाब मधून त्यांना भेटायला आली तेव्हा. मात्र या मुलीला समजूत घालून परत पाठविले गेले. सचिन यांनी त्यावेळी तिची भेटही घेतली नाही. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले होते, कामासाठी कुणी भेट घ्यायला आले असेल तर मी भेटतो पण खासगी वेळेत कुणाला भेटायचे आणि कुणाला नाही याचा निर्णय मीच घेणार. युवकांसाठी सचिन प्रेरणा बनले आहेत. त्याचे वडील वनअधिकारी आहेत तर भाऊ आर्मी मध्ये आहे. सचिन अजून अविवाहित आहेत. २००७ मध्ये आयपीएस झालेले सचिन जेथे जातील तेथे युवक युवती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी करतात असा अनुभव आहे.