तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत होणार सादर


दिवसभर झालेल्या चर्चेनंतर अखेर लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे. मतदानाच्या दरम्यान विधेयकाच्या बाजूने 303 मत तर विरोधात 82 मतं पडली. जेडीयू, टीएमसी आणि कॉग्रेसचे खासदार विधेयकाला विरोध करत संसदेतून सभात्याग केला.

तिहेरी तलाक विधेयक हे मुस्लिम समाजात तीन वेळा तलक म्हणत पत्नीला तलाक देणाऱ्या प्रथेशी संबंधीत आहे.

हैद्राबादचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी संसदेमध्ये चर्चेदरम्यान मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मोदी सरकार आणू पाहत असलेला हा कायदा महिलांच्या विरोधात आहे.

आता सरकारला हे विधेयक राज्यसभेत पास करावे लागणार आहे. मात्र राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नाही. याआधी देखील 2017 मध्ये सरकारतर्फे लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आले होते. मात्र त्यांनतर राज्यसभेत हे विधेयक रखडले होते. त्यामुळे यंदा राज्यसभेत हे विधेयक पास होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment