आनंद कुमार दिल्लीतील सरकारी शाळेत शिकवणार


काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ चित्रपट आला. आनंद कुमार यांचे कार्य हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. आता दिल्लीच्या सरकारी शाळेतही हेच आनंद कुमार शिकवणार आहेत.

याबद्दलची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. माझ्यासोबत दिल्लीच्या सरकारी शाळेत आनंद कुमारांनी भेट दिली. त्यांचे काम आणि व्यक्तिमत्व देशातील प्रत्येक शिक्षकांना प्रेरणा देणारे आहे. सामान्य घरातील मुले त्यांच्यामुळेच जेइइ आणि आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली. यालाच म्हणतात खरा गुरू, असे सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


आनंद कुमार यापुढे महिन्यातून एकदा दिल्लीतील सरकारी शाळेत शिकवण्यासाठी येणार असून ११ आणि १२वीच्या विद्यार्थांना ऑनलाईन पद्धतीने ते शिकवणार आहेत. सिसोदिया यांनी अशी माहिती देत ‘सुपर ३०’ चित्रपट दिल्लीत करमुक्त केल्याची घोषणाही केली.

Leave a Comment