या नवोदित कलाकारामुळे शाहरुख-आमिरचे स्टारडम धोक्यात!


मागील वर्षी अनेक हिट चित्रपट आले. पण मागील संपूर्ण वर्षात बॉलिवूडचे खान मात्र आपली कमाल दाखवू शकले नाही. शाहरुख, आमिर आणि सलमान या सर्वांचे चित्रपट दणक्यात आपटले. पण त्याच दरम्यान दुसरीकडे काही नवोदित अभिनेत्यांनी मात्र बाजी मारत सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे हे चेहरेच भविष्यातील बॉलिवूडचे सुपरस्टार मानले जात आहेत.

मसान चित्रपटातून 4 वर्षांपूर्वी विकी कौशलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर त्याला 2018 मध्ये आलेल्या त्याच्या उरी चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवून दिली. सध्या त्याच्याकडे ‘उधम सिंह’, ‘भूत: द हॉन्टेड शिप’ आणि ‘सॅम मानेक शॉ’ बायोपिक हे चित्रपट आहेत.

सध्या बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा 2012 मध्ये ‘विक्की डोनर’ मधून बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता आयुष्यमान खुराना बनला आहे. नुकताच रिलीज झालेला त्याचा ‘आर्टिकल 15’ विशेष गाजला. याशिवाय सलग 5 हिट चित्रपट आयुष्यमानने दिले आहेत. ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांचा समावेश आहे.

अभिनेता राजकुमार राव बऱ्याच मोठ्या स्ट्रगल नंतर बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याने 2010 मध्ये ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्याचा 2018मध्ये आलेला स्त्री सुपरहिट ठरला. लवकरच त्याचा जजमेंटल है क्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याच्या मागील वर्षी आलेल्या ‘केदारनाथ’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर आलेला त्याचा सोनचिडिया फारसा चालला नाही पण त्यातील सुशांतच्या अभिनयाचे कौतुक झाले.

मागील वर्षी ‘बियॉन्ड द क्लाउड’ या चित्रपटातून शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरने बॉलिवूड पदार्पण केले. या चित्रपटाचे खप कौतुक झाले. याशिवाय त्याचा जान्हवी कपूरसोबत आलेला ‘धडक’ सुद्धा गाजला. त्यामुळे बॉलिवूडचा आगामी चेहरा म्हणून इशानकडे पाहिले जात आहे.

Leave a Comment