लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी काश्मीरमध्ये करणार पेट्रोलिंग


भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा लष्करी गणवेशात देशाची सेवा करताना दिसणार आहे. धोनी या महिन्याच्या अखेरीस 31 जुलैपासून टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये सामिल होणार आहे.

भारतीय सैन्यामध्ये लैफ्टनंट कर्नलपदाने (मानद उपाधी) सन्मानित धोनी पैरा रेजिमेंटमध्ये सहभाग घेणार आहे. धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनबरोबर असणार आहे.

सैनेबरोबर असताना धोनी पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टचे काम पाहणार आहे. यावेळी पुर्णकाळ धोनी जवानांबरोबरच राहणार आहे. तो यावेळी काश्मीरच्या विक्टर फोर्सचा एक भाग असेल.

धोनी याआधी देखील जम्मू-काश्मीरमध्ये आला आहे. 2017 मध्ये धोनी जम्मू-काश्मीरच्या बारामूलामध्ये गेला होता. तेथे त्याने आर्मीतर्फे आयोजित क्रिकेट मॅचमध्ये भाग घेतला होता. धोनी ही मॅच बघायला सैनिकांच्या गणवेशातच गेला होता.

महेंद्रसिंह धोनीला 2011 मध्ये इंडियन टेरोटोरियव आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही रँक देण्यात आली होती. धोनीचे सैन्य प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. विश्वचषकात देखील ग्लॉव्हजवर बलिदान बँच घालून खेळल्याने विवाद झाला होता.

तसेच, भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी धोनीच्या जागी ऋषभ पंत यष्ठीरक्षकाची भूमिका पार पाडणार आहे.