
नवी दिल्ली – तब्बल पाच अब्ज डॉलर्सचा दंड सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रणी कंपनी फेसबुकला ठोठवण्यात आला आहे. फेसबुकवर युझर्सच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप फेडरल ट्रेड कमीशनने (एफटीसी) केला आहे.
युझर्सच्या गोपनीयता भंग केल्याप्रकरणी फेसबुकला तब्बल 5 अब्ज डॉलरचा दंड!
जगातील 2 अब्ज लोक फेसबुकच्या व्यासपीठावर संवाद साधतात. फेसबुकवर युझर्सना खोटे बोलणे, त्यांच्या गोपनियतेचा भंग करणे असे अनेक आरोप फेडरल ट्रेड कमीशनने लावले आहेत. त्यामुळे फेसबुकला ५ अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. फेसबुकचा महसूल आणि नफा पाहता फेसबुकला हा दंड देणे फारसे अवघड जाणार नाही.
या विषयावर अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनमध्ये मतदान झाले असून हा दंड 3-2 मताधिक्याने ठोठावण्यात आला आहे. तंत्रज्ञान कंपनीला होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठरणार आहे. या अगोदर 2012 मध्ये गुगल कंपनीला 22 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.
