ब्रिटनच्या या महाविद्यालयाने दिलेत २१ पंतप्रधान


इंग्लंडच्या प्रसिद्ध इटॉन महाविद्यालयाने एक अनोखा विक्रम नोंदविला असून या महाविद्यालयाने ब्रिटनला आत्तापर्यंत २१ पंतप्रधान दिले आहेत. ब्रेक्झिटच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात पंतप्रधानपदी बोरिस जोन्सन यांची निवड झाली असून टेरेजा मे याच्याकडून त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बोरिस जॉन्सन याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ब्रेक्झिट निर्णयानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेले डेव्हिड कॅमरून हेही याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

हे महाविद्यालय खूप जुने म्हणजे १४४० मध्ये सुरु झालेले आहे. किंग हेन्री सहावा याने १४४० मध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून या महाविद्यालयाची स्थापना केली होती. याचे पहिले नाव किंग्स कॉलेज ऑफ अवर लेडी ऑफ इटॉन बिसाईड विंडसर असे होते. याच राजाने किंग्स कॉलेज केम्ब्रिजची स्थापना केली होती. त्याला शिक्षणात खूप रस होता. या कॉलेजने ब्रिटनला केवल २१ पंतप्रधानच नाही तर अनेक सेलेब्रिटीही दिले आहेत. राजघराण्यातील प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हेन्री येथेच शिकले आहेत.

नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पूर्वी पत्रकार होते. त्यातून ते राजकारणात उतरले. ते ८ वर्षे लंडनचे मेयर होते आणि २०१६ मध्ये त्यांनी देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम केले आहे.

Leave a Comment