पुन्हा प्रदर्शित होतोय उरी, यावेळी मोफत पाहता येणार


येत्या २६ जुलै रोजी देशभर कारगिल विजय दिवस साजरा होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्यातील जनतेला ५०० सिनेमाग्रहात उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी या निर्णयामुळे आपला सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले हा चित्रपट बनविण्याचा हेतू देशवासियांच्या हृदयात अभिमान जागृती व्हावी आणि आपले सैन्य किती उत्तम प्रकारे कार्यरत आहे हे हायलाईट करणे हाच होता.

उरी द सर्जिकल स्ट्राईक हा ११ जानेवारीला देशात रिलीज झाला आणि त्याने अमाप लोकप्रियता मिळविली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड नोंदविली. बॉक्स ऑफिसवर तर तो प्रचंड यशस्वी ठरला. यात मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारणारा विकी कौशल आणि त्याचा हौज द जोश हा डायलॉग प्रचंड गाजला. २०१६ मध्ये जम्मू काश्मीरच्या उरी येथील सैन्यतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. त्यानंतर एक आठवड्यात सेनेने काश्मीर नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक केले त्यावर हे चित्रपट बेतलेला आहे.

Leave a Comment