टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये रोबोट करणार सर्वांचे मनोरंजन


टोकियो 2020 रोबोट प्रोजेक्टच्या अंतर्गत टोयोटाने 7 रोबोट बाजारात आणले आहेत. या रोबोटला टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांसाठी विशेष डिजाईन करण्यात आलेले आहे. हे रोबोट खेळाच्या वेळेस प्रेक्षक आणि खेळाडूंचे मनोरंजन करणार आहे त्याचबरोबर तेथे असलेल्या कामगारांना देखील मदत करणार आहे. याचबरोबर खेळ बघायला आलेल्या दिव्यांगाना त्यांच्या जागेवर खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्यास मदत करणार आहे. यामध्ये माणसांप्रमाणे दिसणाऱ्या रोबोटबरोबरच खेळासाठी तयार करण्यात आलेल्या मसकॉटचा देखील समावेश आहे.

कपंनीने टोकियो 2020 खेळांसाठी एकूण 7 रोबोट्स तयार केले आहे. यामध्ये मिरायटोवा आणि सोमायटी नावाच्या दोन मसकॉटचा समावेश आहे. हे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार तसेच त्यांच्याशी गप्पा देखील मारणार आहेत. तसेच, टी-एचआर3 ह्युमनॉइट रोबोट खेळाडूंना मदत करणार व त्यांच्या वाईस कमांडचे पालन करतील. टोयोटाचे टी-टीआर1 हा रोबोट खेळाशी संबंधीत फुटेज ब्रॉडकास्ट करण्याचे काम करेल. ज्यामुळे जगभरातील प्रेक्षक घरात बसून खेळाचा आनंद घेतील.

मोबिलिटी फॉर ऑल कॉन्सेप्टला लक्षात घेऊन टोयोटाने खेळ बघण्यास आलेल्या दिव्यांगाना मदत करतील असे रोबोट तयार केले आहेत.यामध्ये ह्युमन   सपोर्ट रोबोट आणि डिलीवर सपोर्ट रोबोटचा समावेश आहे.

हे रोबोट प्रेक्षकांची जागा शोधून त्यांना खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि अन्य महत्त्वाचे सामना त्यांच्याजवळ पोहचवणार. कंपनीने मैदानात काम करण्यास मदत करण्यासाठी फिल्ड सपोर्ट रोबोट देखील तयार केला आहे.

Leave a Comment