डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे अप्रतिम फोटो काढण्यासाठी काही टिप्स


तुम्ही फोटोग्राफीची आवड आहे म्हणून नवीन डीएसएलआर कॅमेरा विकत घेतला आहे. मात्र फोटोग्राफीमधील बारीकसारीक गोष्टी शिकण्याऐवजी केवळ सुंदर फोटो काढण्याचा तुमचा हेतू आहे व कॅमेरा शिकण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. याद्वारे बेसिक मोड्स, कॅमेऱ्याचे छोट्या बटनांचे काम आणि फोटो चांगला तुम्हाला चांगला फोटो काढण्यास मदत होईल.

ग्रिप व्यवस्थित असावी –
सर्वात महत्त्वाची असते ग्रिप, ज्यामुळे फोटो काढताना कॅमेरा हलणार नाही. कॅमेऱ्याच्या बॉडीवर ग्रिपच्या बाजून एक हात आणि दुसऱ्या हाताने कॅमेऱ्याच्या लेन्सला खालून पकडावे. आता लेंसला स्थिर ठेवण्यासाठी अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोठाची मदत घ्या आणि बाकी बोटांनी कॅमेऱ्याच्या विरूध्द बाजूने पकडावे.

मोड्सबद्दल माहिती –
डीएसएलआर कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात. ते तुमच्यासाठी फ्लॅश, अपर्चर, शटर स्पीड इत्यादी गोष्टी सेट करतात. तुम्ही हळहळू या गोष्टी समजून घेऊ शकतात. काही कॅमेऱ्यांमध्ये ऑन-ऑफ बटनाबरोबरच मोड डायल असते. तक काही कॅमेऱ्यांमध्ये ऑप्शन्स बघण्यासाठी मोड बटन दाबाबे लागते. तुम्ही कॅमेऱ्याचे मॅन्युअल वाचून याबद्दल माहिती मिळवू शकता.

फ्लॅशबद्दल माहिती –
कोणताही शॉट घेण्याआधी प्लॅशवर पातळ रूमाल, वॅक्स पेपर अथाव नॅपकिन ठेवावा. जेणेकरून ऑब्जेक्टवर जास्त चमक पडणार नाही. कमी लाईटमध्ये देखील सुंदर फोटो काढण्यासाठी, योग्य कवरची निवड करावी. वारंवार केल्याने या गोष्टीची माहिती होते.

ऑटो फोक्स आणि स्टॅबिलायजर –
पहिल्यांदाच फोटो काढणार असेल तर कॅमेऱ्याचे ऑटो फोक्स आणि स्टॅबिलायजर बटन सुरू ठेवावे. ज्यामुळे फोटो अधिक स्पष्ट येईल. हे बटन कॅमेऱ्यावरच असते.

Leave a Comment