गे कपलने अमेरिकेत केले भारतीय रितीरिवाजाप्रमाणे लग्न


म्हणतात की, प्रमे कधीही, कोठेही आणि कोणाबरोबरही होऊ शकते आणि हे खरे देखील आहे. त्यामुळेच अनेक देशात समलैंगिकतेला वैध ठरवण्यात आले आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतामध्ये मागील वर्षी कलम 377 रद्द करण्यात आले. न्यू जर्सीमधील एका कपलने सिध्द केले आहे की, प्रेम करण्यापासून कोणीच कोणाला अडवू शकत नाही. काही दिवसांपुर्वीच एका भारतीय कपलने अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पुरूष आहेत.


कोरिओग्राफर अमित शाह आणि आदित्य मदीराजू या दोघांनी भारतीय परंपरेने लग्न केले. दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले. त्यांच्या लग्नामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दोघांनी हे फोटो शेअर करताना त्यांच्या आनंदात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.


आदित्यने एक फोटो शेअर करत सर्वांना धन्यवाद म्हणाला आणि त्याने लिहिले की, त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार ज्यांनी वेळ काढून आम्हाला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या मेसेजचे उत्तर देणे शक्य नाही. मात्र आम्हाला जो पाठिंबा मिळाला त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यत परत जातो, मात्र एक गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे की समानतेचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कोणाबरोबरही त्याने वेगळा रस्ता निवडला म्हणून वाईट वर्तवणूक करू नये. माणूसकी आणि प्रेम हे तिरस्काराच्या पलीकडे आहे.


एका मुलाखतीमध्ये आपल्या भारतीय लग्नाविषयी अमित म्हणाला की, आम्हाला भारतीय पध्दतीने लग्न करायचे होते. त्यावेळी आदित्यचे आईवडिल भारतात राहत  होते ते पहिल्यांदाच अमेरिकेत आले होते. आम्ही लकी आहोत की आमचे आई वडील आम्हाला पाठिंबा देतात.

Leave a Comment