इंडियन एअरफोर्सचा थरारक ऑनलाईन गेम येतोय


स्मार्टफोन गेम युजर्समध्ये प्रचंड संख्येने वाढ होत असून दररोज नवनवीन ऑनलाईन गेम्स बाजारात येत आहेत. सध्या पीयुबीजी गेमची क्रेझ आहे. या गेमला टक्कर देण्यासाठी इंडियन एअरफोर्सने एक थरारक, रोमांचकारी ऑनलाईन व्हिडीओ गेम लाँच करण्याची तयारी केली आहे. इंडियन एअरफोर्सच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर या नवीन गेमचा टीझर रिलीज केला गेला आहे. हा काँबॅट गेम अँड्राईड आणि आयओएस साठी असून ३१ जुलै रोजी अधिकृत लाँच होणार आहे.

या गेमचे सिंगल प्लेअर वर्जन सुरवातीला लाँच केले जात असून यात युजरना थ्रिलिंग फ्लाईंगचा अनुभव घेता येणार आहे. गेमचा टीझर पाहूनच हा गेम किती थरारक आहे याचा अंदाज येत आहे. प्लेअरना यात वेगवेगळी मिशन पूर्ण करावी लागणार आहेत. त्यात फायटर जेट, हेलिकॉप्टर उडविताना शत्रूचा, शत्रूच्या बेसकॅम्पचा तसेच विमानांचा नाश करावा लागणार आहे. यात यात इंडियन एअरफोर्सचा हिरो बनलेले विंग कमांडर अभिनंदन यांना हिरो दाखविले गेले आहे.

सध्या ऑनलाईन गेममध्ये पीयुबीजी सर्वाधिक लोकप्रिय मल्टीप्लेअर बॅटल रॉयल गेम असून त्याचे १० कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत.

Leave a Comment