ट्रम्प 828 दिवसांमध्ये 10,111 वेळा बोलले खोटं


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी काश्मीर मुद्दावर गैरजबाबदार विधान केले.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काश्मीरच्या मुद्दावर मध्यस्थी करण्यास सांगितले आहे.

भारताने मात्र ट्रम्प यांचे हे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. भारताचे म्हणणे आहे की, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि यामध्ये तिसऱ्या पक्षाची कोणतीच भूमिका नाही. तसेच व्हाईट हाऊसने देखील पत्रकार परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये देखील काश्मीरविषयी कोणतीच माहिती नव्हती. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, आम्ही शांती, स्थिरता आणि आर्थिक समृध्दीसाठी पाकिस्तानबरोबर काम करू इच्छितो.

ट्रम्प पहिल्यांदाच खोटं बोललेले नाहीत. ते दररोज वेगवेगळ्या प्रकरणात खोट बोलत असल्याचे पाहिला मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार, ट्रम्प दररोज 23 वेळा खोटं बोलतात. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 21 एप्रिलपर्यंत ट्रम्प यांनी 828 दिवसात 10,111 वेळा खोटे दावे केले आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी ट्विटरवर पोस्ट केल्या ट्विटचा देखील समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ तीन दिवसात (25-27 एप्रिल) ट्रम्प 171 वेळा खोट बोलले आहेत.

याआधी वॉशिंग्टन पोस्टने ट्रम्प यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर दोन वर्षांनी रिपोर्ट प्रकाशित केला होता. ज्यामध्ये म्हटले होते की, ट्रम्प यांनी या काळात 8158 वेळा खोटं आणि चुकीचे दावे केले आहेत. ट्रम्प इमिग्रेशनवर 1433, विदेशी धोरणांवर 900, व्यापाराविषयी 845, अर्थव्यवस्थेविषयी 790, नोकऱ्यांविषयी 755 आणि अन्य प्रकरणात 899 वेळा खोटं बोलले आहेत

रिपोर्टमध्ये फॅक्ट चेकरच्या आकड्यांचा संदर्भ देण्यात आला आहे. फॅक्ट चेकर ट्रम्प यांच्याद्वारे देण्यात आलेली भाषणे, विधान यांचे विश्लेषण करून सत्य तपासते.

Leave a Comment