इबोला सारखे 9 विषाणू भारतासाठी ठरू शकतात घातक


भारताला अनेक संसर्गजन्य विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांपासून लढण्यासाठी स्वतःला तयार करावे लागणार आहे. या रोगांमध्ये इबोला विषाणूचा समावेश असून, या विषाणूने अफ्रिकी देशांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचे जीव घेतले आहेत. हा विषाणू काही वर्षांमध्ये अन्य देशात पसरला आहे. मात्र भारत अद्याप या रोगापासून वाचलेला आहे.

देशातील आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र या संस्थानी दहा विषाणूंचे संक्रमण केले आहे, जे येणाऱ्या काळात भारतीय नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार आहेत. यामध्ये इबोला, एमईआरएस-सीओवी, येलो फीवर आणि एच7एन9 सारखे आजार आहेत.

याशिवाय या विषाणूंमध्ये युसुटू विषाणू, टिलापिया नोवेल हेपेटाइटिस, सायक्लोन विषाणू, बेनो रिया विषाणू आणि कैनाइन परवो विषाणूंचा समावेश आहे.

आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय प्रवासांमुळे या आजारांचा भारतामध्ये प्रवेश होण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे आणिबाणीसाठी तयार राहणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, जवळपास 30 हजार भारतीय युगांडामध्ये राहत आहेत. तेथे इबोला विषाणू आहे. आपले काही सैनिक डैमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गोमध्ये आहेत. तेथे इबोला विषाणूची परिस्थिती भयंकर आहे.

इबोला हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. यामुळे रक्तस्त्रावी ताप येतो. या आजाराच्या 70 टक्के प्रकरणात लोकांचा मृत्यू होतो.

एमईआरएस-सीओवी रोगाचा रोगी सर्वात प्रथम 2012 मध्ये सौदी अरेबियात रिपोर्ट करण्यात आला होता. त्यानंतर हा रोग 26 देशांमध्ये पसरला. या आजारात शरीरातील अनेक भाग एकाच वेळेस काम करणे बंद करतात. भारतात या आजाराचे एकही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही.

वटवाघळांद्वारे हा आजार पसरल्याचे सांगितले जाते. भारतामध्ये अनेक प्रजातींची वटवाघळ बघायला मिळतात. मध्ये पुर्वेतून देखील अनेक लोक प्रवास करतात. या सर्व गोष्टींमुळे देशात विषाणूंचे संक्रमण करणे गरजेचे आहे. याशिवाय एच7एन9 आणि एच9एन2 या आजारांची काही प्रकरण देखील समोर आली आहेत. डॉक्टर भार्गव यांचे म्हणणे आहे की, आपल्या देशाकडे भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी मुलभूत संरचना आणि विशेषज्ञता आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment