1000 वर्षात पहिल्यांदाच परदेशी नागरिकाने जिंकली ही अनोखी स्पर्धा


दक्षिण रशियातील सायबेरिया येथील तुवा येथे शेतकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येणारा नाडिम फेस्टीवल सोमवारी समाप्त झाला. या दरम्यान अनेक स्पर्धा झाल्या. यामध्ये एक स्पर्धा जिंवत बकऱ्याला खांद्यावर घेऊन उठाबशा काढायच्या अशी होती. मागील 1000 वर्षात एकाही परदेशी नागरिकाने ही स्पर्धा जिंकली नव्हती. मात्र यंदा हा विक्रम मोडला गेला आहे. शीप स्वाक्टिंग स्पर्धेत स्विर्झलँडच्या डॉ.  गिनो कस्परीने 50 किलो बकऱ्यासह 104 उठाबशा काढल्या आहेत. या वेळी स्थानिक लोक त्यांचा उत्साह वाढवत होते. बक्षीस म्हणून डॉ. कस्परीला फ्रेम करण्यात आलेले प्रमाणपत्र आणि त्यांनी उचललेली ती बकरी देण्यात आली. जेणेकरून ते त्यांच्या घरी जाऊन ती बकरी सर्वांना दाखवू शकतील.

डॉ. कस्परी मकबऱ्यांची दुरूस्ती संबंधीत एका प्रोजेक्टसाठी सायबेरियात आहेत. स्पर्धेमध्ये 30 लोकांनी भाग घेतला होता. यावेळी अनेक लोक एकमेकांना चँलेज देत होते. अशा वेळी कस्परी यांनी हे आव्हान स्विकारले. या स्पर्धेत महिला देखील भाग घेतात, मात्र त्यांचे आयोजन वेगळे असते. महिलांना वयानुसार कमी वजनाच्या बकऱ्या देण्यात येत असतात. सायबेरियामध्ये दरवर्षी नाडिम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असते. हा फेस्टिवल चार दिवस सुरू असतो. यामध्ये उंटाची धावण्याची स्पर्धा, तिरंदाजी, बॉक्सिग या स्पर्धा असतात.

Leave a Comment