न्यायालयात कलम 377 विरूध्द लढणाऱ्या वकील स्वतःही आहेत समलैंगिक


मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत कलम 377 रद्द केले होते.  मात्र ही लढाई एवढी सोपी नव्हती. LGBTQ समुदायाच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकील मेनका गुरूस्वामी आणि अरूंधती काटजू यांनी मोठी लढाई दिली. सर्वोच्च न्यायालयात मिळालेला हा विजय केवळ त्यांच्या वकीली पेशाचा विजय नसून, या निकालाचे त्यांच्या खासगी आयुष्यात देखील महत्त्व आहे.

मेनका आणि अरुंधती या दोघीही यशस्वी वकील आहेत. मेनकाने हॉवर्डमधून एलएलएम आणि ऑक्सफॉर्ड युनिवर्सिटीमधून डीफिल केले आहे. तर बर्लिनच्या इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड स्टडीजच्या फेलो राहिल्या आहेत. एवढेच नाही तर त्या कोलंबिया लॉ स्कूल, येल लॉ स्कूल, न्युयॉर्क युनिवर्सिटी ऑफ लॉ सारख्या प्रसिध्द शैक्षणिक संस्थांमध्ये विजिटिंग फॅक्लटी आहेत. तर अरुंधतीने कोलंबिया युनिवर्सिटीमधून एलएलएमची पदवी मिळवली आहे.

ऐतिहासिक निर्णयाच्या एक वर्षानंतर आता मेनका आणि अरुंधती यांनी खुलासा केला आहे की, त्या दोघीही लेस्बियन कपल आहेत. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोघींनी कलम 377 विषयीच नाही तर स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी कलम 377 रद्द केले होते. या निर्णयाची आठवण करत मेनका आणि अरुंधती म्हणाल्या की, त्या दोघी त्यावेळी खुप आनंदी झाल्या होत्या. त्यांच्या मुलींना बघण्यासाठी त्यांचे कुटूंबातील लोक देखील कोर्टात आले होते आणि निर्णयानंतर ते देखील आनंदी झाले होते.

अरुंधतीने काही दिवसांपुर्वी ट्विटरवर #SareeTwitter या ट्रेंडवर मेनकाबरोबरील फोटो पोस्ट केला होता.

मुलाखतीनंतर ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत.

याशिवाय या दोघींविषयी सांगायचे झाले तर, टाईम मॅग्झिनने 2019 मध्ये 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये या दोघींना स्थान दिले होते.

Leave a Comment