पावसाळ्यात प्रत्येकाने या 5 ठिकाणी नक्की भेट द्यायला हवी


भारत आपली सभ्यता आणि परंपरेसाठी जगभरात प्रसिध्द आहे. मात्र भारतातील नैसर्गिक सुंदरता देशाला आणखी समृध्द बनवते. फोटोमध्ये ज्या जागेंची नैसर्गिक सुंदरता बघून, मन उत्सुक होते अशा जागेंवर जाण्याची संधी मिळाली तर मन आणि डोळे दोन्ही तृप्त होतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच निसर्गाने नटलेल्या सुंदर जागेंविषयी सांगणार आहोत. पावसाळ्यात या ठिकाणांचे दृष्य अविश्वसनीय असते.

अथिरापल्ली फॉल –
अथिरापल्ली धबधबा सुंदर आहे. हा धबधबा 80 फुट उंच आणि 330 फुच रूंद आहे. अथिरापल्ली धबधब्याकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या ताड आणि नारळाच्या झाडांमधून चालत केले तरी दमल्यासारखे वाटत नाही. धबधब्या पर्यंत पोहचण्यासाठी 2 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हे ठिकाण चालकुडी नदी आणि शोलायर परिसरात आहे. अथिरापल्लीला ऑगस्ट महिन्यात पर्यटक भेट देतात कारण यावेळी येथील तापमान 28 डिग्री सेल्सियस असते. येथे पोहचण्यासाठी जवळील विमानतळ कोच्ची विमानतळ आणि रेल्वे स्टेशन चालकुडी हे आहे.

जोग फॉल –
जोग अथवा गेरोस्पा फॉल हा भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा कर्नाटकातील शारोगा आणि उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये आहे. जोग फॉल्स जगातील प्रसिध्द धबधब्यांपैकी एक आहे. धबधब्यावर ट्रेकिंगसाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

चित्रकूट फॉल –
चित्रकूट फॉलला भारतातील नायगरा फॉल देखील म्हटले जाते. हा धबधबा छत्तीसगडमधील जगदलपूर जवळ आहे. विद्यांचलाच्या पर्वतांमधील मैदानामध्ये असलेला चित्रकूट धबधबा जगातील सर्वात शानदार नैसर्गिक आकर्षण आहे.

चचाई फॉल –
चचाई धबधबा मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात आहे. चचाई फॉल भारतातील 23 वा सर्वात मोठा धबधा आहे तर मध्यप्रदेशातील सर्वात मोठा धबधबा आहे.

नोहकलिकाई फॉल –
नोकालिकाई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा चेरापुंजी येथे आहे. याची उंची तब्बल 1115 फुट आहे. चेरापुंजीचा सर्वात उंच धबधबा बघण्यासाठी परदेशातून लोक येत असतात.

Leave a Comment