ही आहे आंतरखंडीय स्विमिंग रेस


तुर्कस्तानातील इस्तंबुल मध्ये रविवारी ३१ वी बोस्फोरास क्रॉस काँटीनेन्टल स्विमिंग रेस पार पडली त्यात जगभरातून २४०० जलतरणपटू सामील झाले होते. त्यातील १२०० तुर्कस्तानचे होते. या रेसचे वैशिष्ट म्हणजे जलमार्गाच्या आशियाई किनाऱ्यापासून सुरु होणारी ही रेस युरोपियन किनाऱ्यावर संपते. ६.५ किमी अंतराची ही रेस जगातील सर्वश्रेष्ठ ओपन वॉटर स्विमिंग रेस म्हणून ओळखली जाते.


ही जगातील एकमेव इंटर काँटीनेन्टल स्विमिंग रेस आहे. कानीला पिअरपासून सुरु झालेली ही रेस यंदा १० तासात बोस्फोरास पार करून कुरुकेस मध्ये संपली. यात १४ ते ८९ वयोगटातील जलतरणपटू सहभागी झाले होते. या रेससाठी इस्तंबूलने त्यांचे शिपिंग ट्रॅफिक एक दिवसासाठी बंद केले होते. १९८९ मध्ये पहिली बोस्फोरास क्रॉस काँटीनेन्टल स्विमिंग रेस पार पडली होती तेव्हा त्यात ६४ पुरुष आणि ४ महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Comment